About us

Join us FREE!

Chatrapati 🙏🙏🚩🚩🚩

Blog by Ranjit Surekhrao Desai connectclue-author-image

All > History > Chatrapati 🚩🚩🙏

1 like

Please login to like this article.

connectclue-linkedin-share

हिंदुस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच गनिमीकाव्याने युद्ध न होता मैदानी युद्ध झाले ते  दाऊदखान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात न भूतो न भविष्यती युद्ध झाले. हे युद्ध  मराठ्यांसाठी खुप महत्त्वाचे होते.  

        छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची बेसुरत करून राजगडाकडे खजिन्यासह दौडत सुटले ते थेट बागलाण प्रांतात आले. औरंगाबादचा सुभेदार शहाजदा मुअज्जमला खबर मिळाली. खबर ऐकून त्याने ताबडतोब   दाऊदखान यास पाठवले. छत्रपती शिवाजी महाराजांना दाऊदखान येत असल्याची खबर भेटली म्हणून ते वणी दिंडोरीच्या मार्गाने झपाटयाने निघाले.दाऊदखानाला खबर मिळाली की मराठे कांचमंचनच्या घाट पार करून नाशिककडे जाणार आहे. ही खबर कानी पडताच त्याने त्याने कांचनबरीच्या दक्षिणेकडे मराठयांना रोखायचे असे ठरवून तो त्या दिशेने कुच करू लागला. त्याच्यासोबत  मीर अब्दूल मबूद, इख्लासखान, राय मकरंद,नारोजी बसवंतराय,शेख सुफी ,भान पुरोहित संग्रामखान हे सरदार व बाकी मोठी  फौज होती 


      

छत्रपती शिवाजी महाराज कांचनबरीच्या किल्ल्यावर  फौजेसह,खजिना, संपत्ती वाहक बैल घोडे  १५हजार फौज होती . महाराजांना अजून एक समजली की दाऊदखान इकडेच येतोय फौज घेऊन. महाराजांना अगोदर पासून माहित होते की युद्ध अटळ आहे म्हणून खजिना, बैल,घोडे ५००० फौज  सप्तश्रृंगी व वणीच्या मार्गाने पाठवून दिले. 

 युद्धाचा दिवस उजाडला तारीख होती १७ ऑगस्ट १६७०.  खासा इख्लासखान कांचन किल्ल्याच्या पायथ्याशी आला. होता.तर त्याने त्याने बघितले तर मराठे जय्यत तयारीत आहेत व खुद्द खासे श्री छत्रपती शिवाजी महाराज चिलखत घालून ,हातात दांडपट्टा घालून घोड्यावर बसून युद्धाचे नेतृत्व करत होते.मराठयांनी इख्लासखान चा तोफखाना बरबाद केला. महाराजांनी केलेल्या युद्धरचने प्रमाणे इख्लास खान यास चारही बाजूंनी घेरले. इख्लासखान च्या ही गोष्ट लक्षात आली तो फौजेसह जाऊन मराठ्यांवर कोसळला. युद्ध सुरु झाले . मराठे शौर्याची पराकाष्ठा करीत होते. मोंगल सरदार कुमक करत होते. हत्ती मराठ्यांच्या ताब्यात आले खासा इख्लासखान जखमी होऊन घोडयावरून कोसळला. दाऊदखानला ही बातमी समजताच त्याने राय मकरंद नावाच्या सरदारास पाठवले.

         युद्ध खुप भयंकर चालले होते. मराठ्यांनी मुघलांचे पुरते कंबरडे मोडले होते . अजून एक संग्रामखान नावाचा सरदार लढता लढता जखमी झाला. बुंदेली बर्कंदाजांनी मराठयांन पथ्यावर धरले होते. त्यामुळे मराठयांची गती खेचली जात  होती. ऐन दुपारी दाऊदखान रणात आला त्याने इख्लासखानास बाहेर काढले. दोन प्रहर कडाक्याचे युद्ध झाले.३००० मोगल ठार झाले. दाऊदखानाची फौज खचली. मोगल घसरून पळून जाऊ लागले. त्यातच मीर अब्दूल मबूद याचा मोंगलांच्या मुख्य सेनेशी संबध तुटला.

मराठयांनी याचा फायदा घेऊन त्याच्यावर हल्ला चढवला त्यात त्याचा मुलगा ठार झाला. मराठयांनी तोफा,निशाणी जप्त केली. दाऊदखान याने युद्धाचा रंग बघता माघार घेण्याचे ठरवले.व्यंकोजी दत्तो,अण्णाजीपंत,मोरोपंत पिंगळे ,बालप्रभु चिटणीस , आनंदराव यांनी सुद्धां पराक्रमाची शर्थ केली  अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रचंड विजय झाला. युद्धात मिळालेले साहित्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराज कुंजरगडावर गेले. या मैदानी युद्धामुळे मराठेशाहीचा दरारा दाहीदिशी दणाणत होता.

प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर,महाराजाधिराज. श्री छत्रपती शिवाजी महाराज  व पराक्रमी रणझुंजार मावळयांना मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



connectclue-linkedin-share

More articles:


Recent lost & found:


Login for enhanced experience

connectclue-tick Create and manage your profile

connectclue-tick Refer an author and get bonus Learn more

connectclue-tick Publish any lost and found belongings

connectclue-tick Connect with the authors & add your review comments

connectclue-tick Join us for Free to advertise for your business or Contact-us for more details

connectclue-tick Join us for Free to publish your own blogs, articles or tutorials and get your Benefits

connectclue-login

Discover your area of interest

More recent categories

Back to top