About us

Join us FREE!

Chatrapati 🙏🙏🚩🚩🚩

Blog by Ranjit Surekhrao Desai connectclue-author-image

All > History > Chatrapati 🚩🚩🙏

1 like

Please login to like this article.

connectclue-linkedin-share

छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले...

हे नाव म्हणजेच एक रणांगण आहे... !!

या  रणांगणात अगदी जन्मापासून युद्धाला सुरुवात झाली....!!

तेही तेव्हापासून  , जेव्हा त्या रणांगणाने अजून मोकळा श्वास सुद्धा घेतला नव्हता ... ( १४ मे १६५७)

सई बाईंच्या पोटी जन्माला आलेले हे भोसले राजकुळाचे युवराज म्हणजे खरोखरच रयतेच्या राजा चा राजपुत्र होता !!

कारण याच्या रक्तात  शिवाजी राजे नावाचे युगंधर  होते तर सईबाई नावचे वात्सल्य सुद्धा....!

पण ओठावर उतरणार दुध होते ते मावळखोर्यातील एका विरमातेचं , रयतेचं!!
 ( धाराऊ)

आईने तेव्हा हात सोडला जेव्हा त्यांनी त्यांच्या बोबडे शब्दांत नुकतेच आई म्हटलं होतं... पण तरीही हे रणांगण जिवनाचं युद्ध सोडून दुर गेले नाही...!!

तर अगदी यवनदुत म्हणून आलेल्या जयसिंग नावाच्या गोठ्यात मावळ रक्ताचं शौर्यवंत धग दाखवत , आग्रा ला आपल्या आबासाहेबांच्या स्वाभिमानाचं जाज्वल्य अग्निकुंड  बघत आपल्या लहानग्या खांद्यावर स्वराज्याच्या राजाचं धैर्य, शकपर्व या युवराजांनी संभाळलं...

शत्रू तर मुघल सारखे बलाढ्य पुढे होतेच , पण  राज्यभिषेक होऊन शककर्त्याच्या मेरुमणी झालेल्या शिवछत्रपतींचा या पुत्राला तोंड द्यावे लागले ते आपल्या आप्तांना च अधिक ..

तरीही पराक्रम आणि धैर्य घेऊन लढणारा हा योद्धा सांबभोळा म्हणून सर्वांना सोबत घेऊन चलतच होता..

राजमाता जिजाबाई नावाचे विद्यापीठा चे शास्त्रपंडीत असलेले विद्यार्थी म्हणजे शंभुराजे आपल्या अवघ्या बत्तीस वर्षाच्या आयुत कुठल्याही राजपुत्राने जे सोसले नाही ते सर्व बघून रणांगण गाजवत राहिले...

आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन सुद्धा न प्राप्त होऊ शकलेला युवराज आपल्या आबासाहेबांच्या संकल्पित साठी शेवटच्या क्षणा पर्यंत जगला..

जिवन जगताना तर हे रणांगण लढलेच पण आपल्या शेवटच्या क्षणी सुद्धा हा मृत्युंजय राजा रणविक्रम विर म्हणून लढत राहिला अगदी चाळीस दिवस, स्वराज्य आणि धर्म राखत...अगदी शेवटच्या क्षणा पर्यंत...

अगदी अंगावर येणारे शस्त्र, घाव , उमटणारे वर्ण या प्रत्येक गोष्टीस सोसत हा योद्धा मृत्युंजय बनून लढला..

पण तरीही या रणांगणाने झुकणे मान्य केले नाही , नमने मान्य केले नाही !!

कारण मावळखोर्यात अश्वारूढ होऊन अवघ्या महाराष्ट्रभर स्वराज्य धर्मतेजाचा ध्वज घेऊन धावलेल्या राजाच्या मनगटात अगदी सह्याद्री आणि सातपुडा सामावलेले होते !!

शरीरात भिमा, वर्धा, गोदावरी आणि कृष्णेचं पाणी वाहत होते आणि अंगात शिवशाही रक्त बनुन धावत होती ...

आपल्या मृत्यु पर्यंत देव , देश आणि धर्माचं पोत घेऊन स्वराज्यवरदायीनी चा गोंधळ करणाऱ्या या शंभुचं जिवन म्हणजे खरोखरच एक रणांगण होतं !!

आणि मृत्यु नंतर सुद्धा हा रणांगण अजूनही लढतोय...
रंगेल, रगेल या आपल्याच फितुरांनी चालवलेल्या शस्त्रांनी...!!

पण तरीही हे समररणांगण अजूनही विजयीच आहे , आणि अजूनही तो रौद्र शंभु मराठ्यांच्या पराक्रमाचा गोंधळ करतोच आहे...

फक्त जगदंबे तु गोंधळाला ये....
#अग्निगंध




connectclue-linkedin-share

More articles:


Recent lost & found:


Login for enhanced experience

connectclue-tick Create and manage your profile

connectclue-tick Refer an author and get bonus Learn more

connectclue-tick Publish any lost and found belongings

connectclue-tick Connect with the authors & add your review comments

connectclue-tick Join us for Free to advertise for your business or Contact-us for more details

connectclue-tick Join us for Free to publish your own blogs, articles or tutorials and get your Benefits

connectclue-login

Discover your area of interest

More recent categories

Back to top