About us

Join us FREE!

Write and publish your ideas, thoughts, blogs or articles on any topic. You are at right place for guest blogging. Post tutorials for knowledge sharing. Upload respective images and tag your YouTube or Facebook videos with the articles and share it on various social media with simple steps. Join us Free to add your post.



Monthly trending articles on ConnectClue

Shivam  posted in History

Anuska  posted in Poetry

Deepanjali  posted in Yoga

Showing results for Ranjit Surekhrao Desai Remove
छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले...

हे नाव म्हणजेच एक रणांगण आहे... !!

या  रणांगणात अगदी जन्मापासून युद्धाला सुरुवात झाली....!!

तेही तेव्हापासून  , जेव्हा त्या रणांगणाने अजून मोकळा श्वास सुद्धा घेतला नव्हता ... ( १४ मे १६५७)

सई बाईंच्या पोटी जन्माला आलेले हे भोसले राजकुळाचे युवराज म्हणजे खरोखरच रयतेच्या राजा चा राजपुत्र होता !!

कारण याच्या रक्तात  शिवाजी राजे नावाचे युगंधर  होते तर सईबाई नावचे वात्सल्य सुद्धा....!

पण ओठावर उतरणार दुध होते ते मावळखोर्यातील एका विरमातेचं , रयतेचं!!
 ( धाराऊ)

आईने तेव्हा हात सोडला जेव्हा त्यांनी त्यांच्या बोबडे शब्दांत नुकतेच आई म्हटलं होतं... पण तरीही हे रणांगण जिवनाचं युद्ध सोडून दुर गेले नाही...!!

तर अगदी यवनदुत म्हणून आलेल्या जयसिंग नावाच्या गोठ्यात मावळ रक्ताचं शौर्यवंत धग दाखवत , आग्रा ला आपल्या आबासाहेबांच्या स्वाभिमानाचं जाज्वल्य अग्निकुंड  बघत आपल्या लहानग्या खांद्यावर स्वराज्याच्या राजाचं धैर्य, शकपर्व या युवराजांनी संभाळलं...

शत्रू तर मुघल सारखे बलाढ्य पुढे होतेच , पण  राज्यभिषेक होऊन शककर्त्याच्या मेरुमणी झालेल्या शिवछत्रपतींचा या पुत्राला तोंड द्यावे लागले ते आपल्या आप्तांना च अधिक ..

तरीही पराक्रम आणि धैर्य घेऊन लढणारा हा योद्धा सांबभोळा म्हणून सर्वांना सोबत घेऊन चलतच होता..

राजमाता जिजाबाई नावाचे विद्यापीठा चे शास्त्रपंडीत असलेले विद्यार्थी म्हणजे शंभुराजे आपल्या अवघ्या बत्तीस वर्षाच्या आयुत कुठल्याही राजपुत्राने जे सोसले नाही ते सर्व बघून रणांगण गाजवत राहिले...

आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन सुद्धा न प्राप्त होऊ शकलेला युवराज आपल्या आबासाहेबांच्या संकल्पित साठी शेवटच्या क्षणा पर्यंत जगला..

जिवन जगताना तर हे रणांगण लढलेच पण आपल्या शेवटच्या क्षणी सुद्धा हा मृत्युंजय राजा रणविक्रम विर म्हणून लढत राहिला अगदी चाळीस दिवस, स्वराज्य आणि धर्म राखत...अगदी शेवटच्या क्षणा पर्यंत...

अगदी अंगावर येणारे शस्त्र, घाव , उमटणारे वर्ण या प्रत्येक गोष्टीस सोसत हा योद्धा मृत्युंजय बनून लढला..

पण तरीही या रणांगणाने झुकणे मान्य केले नाही , नमने मान्य केले नाही !!

कारण मावळखोर्यात अश्वारूढ होऊन अवघ्या महाराष्ट्रभर स्वराज्य धर्मतेजाचा ध्वज घेऊन धावलेल्या राजाच्या मनगटात अगदी सह्याद्री आणि सातपुडा सामावलेले होते !!

शरीरात भिमा, वर्धा, गोदावरी आणि कृष्णेचं पाणी वाहत होते आणि अंगात शिवशाही रक्त बनुन धावत होती ...

आपल्या मृत्यु पर्यंत देव , देश आणि धर्माचं पोत घेऊन स्वराज्यवरदायीनी चा गोंधळ करणाऱ्या या शंभुचं जिवन म्हणजे खरोखरच एक रणांगण होतं !!

आणि मृत्यु नंतर सुद्धा हा रणांगण अजूनही लढतोय...
रंगेल, रगेल या आपल्याच फितुरांनी चालवलेल्या शस्त्रांनी...!!

पण तरीही हे समररणांगण अजूनही विजयीच आहे , आणि अजूनही तो रौद्र शंभु मराठ्यांच्या पराक्रमाचा गोंधळ करतोच आहे...

फक्त जगदंबे तु गोंधळाला ये....
#अग्निगंध



Ranjit  posted in History

Post updated on:  Oct 24, 2021 11:11:35 AM

🚩 एका माऊलीची शौर्यगाथा 🚩
हिरकणी बुरुजाची सत्यकथा

मराठी साम्राज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडवरील प्रसिद्ध हिरकणी बुरुजाची सत्यकथा?

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याच्या राजधानीसाठी किल्ले रायगड उभारला. १६७४ साली महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न झाला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ह्या किल्ल्याची बांधनी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय चांगली होती. ४४०० फुट उंची असलेल्या ह्या गडावर दरवाज्यांखेरीज कोणताही येण्याजाण्याचा मार्ग नव्हता. असे म्हंटले जायचे की ? ?रायगडाचे दरवाजे बंद झाले की, "खालून वर येईल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी", पण ह्या गोष्टीला अपवाद ठरणारी एक स्त्री म्हणजेच ? "हिरकणी"

किल्ले रायगडाच्या खाली काही अंतरावर "वाकुसरे" (वाळूसरे) नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक धनगर व्यक्तीचे कुटुंब राहत होते. घरात त्या व्यक्ती समवेत त्याची आई, बायको "हिरा"(हिरकणी) व त्यांचे एक तान्हे बाळ राहत असे. दूध विकून मिळणाऱ्या पैश्यातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत.  त्याची बायको रोज सकाळी गडावरती दूध विकण्यास जात असे. एके दिवशी रोजच्याप्रमाणे हिरा गडावर दूध विकण्यास गेली, पण तिला त्या दिवशी काहीएक कारणाने दरवाजापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. ती गडाच्या दरवाजांजवळ आली, पण पाहते तर काय दरवाजे बंद झालेले होते. गडकऱ्यांना तिने फार विनंती केली, पण त्यांनी दरवाजे उघडण्यास नकार दिला. कारण सकाळी उघडलेले दरवाजे सूर्यास्तानंतर बंद झाले कि, ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडत असत. छत्रपतींची ही आज्ञा सर्वांना लागू होती. कोणालाही त्यासाठी मुभा नसे. पण हिराला आपल्या तान्ह्या बाळाची चिंता लागली होती. आईवाचून ते तान्हे बाळ रात्रभर कसे राहील, ह्या विचाराने त्या आईची चिंता वाढतच चालली. ह्या विचारातच हिराने किल्ल्याच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. अंधारात कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीव पणाला लावण्याच्या बरोबरीचे होते. कारण सर्वत्र खोल दऱ्या, दाट झाडे-झुडपे आणि त्यात अंधार. पण बाळाच्या प्रेमापोटी ह्या मातेने हा निर्णय घेतला. गडाच्या कड्यांचे निरीक्षण केले. एका कड्यावर येऊन पोहोचली आणि त्याच कड्यावरून खाली उतरली. खाली पोहोचेपर्यंत मात्र सभोवतालच्या झाडा-झुडपांमुळे अंगावर अनेक ठिकाणी ओरबडल्याने रक्त आलेले होते. त्याच अवस्थेत गड उतरून ती आई आपल्या घरी परतली. घरी परतताच पहिल्यांदा त्या आईने आपल्या बाळाला कुशीत घेतले. बाळाच्या दर्शनाने त्या आईला जो आनंद झाला, तो मात्र जखमांच्या वेदनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता.
 
ही घडलेली गोष्ट जेव्हा महाराजांना कळली, तेव्हा ते अत्यंत अश्यर्यचकित झाले. कारण शत्रूच्या सैन्यालाही दरवाजातून येण्या-जाण्या शिवाय मार्ग उपलब्ध नसणाऱ्या रायगडावरून एक स्त्री खाली कशी पोहोचली. हा प्रश्न महाराजांसहित सर्वांनाच अन्नुतरीत होता. महाराजांनी हिराला गडावर बोलावण्यास सांगितले. हिरा गडावर आली, ती आल्यानंतर महाराजांनी तिला ह्या सर्व घटनेविषयी विचारले असता, हिरकणीने महाराजांना घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला व आपल्या तान्ह्या बाळाला भेटण्यासाठी हा एकच मार्ग उपलब्ध होता असे सांगितले. हे ऐकून त्या शूर मातेचा महाराजांनी साडी-चोळी देऊन सन्मान तर केलाच पण ज्या कड्यावरून ती खाली उतरली त्या कड्यावर आईच्या प्रेमाची साक्ष म्हणून एक बुरुज बांधण्यात आला. तो बुरुज म्हणजेच रायगडावरील ?हिरकणी बुरुज?. त्याचबरोबर ती राहत असलेल्या गावाला तिचे नाव देण्यात आले. ते गाव म्हणजेच रायगडाजवळील ?हिरकणीवाडी?. 

सध्या रायगडावर जाण्या-येण्यासाठी बनवण्यात आलेला रोपवे (Ropeway) हा त्याच ?हिरकणीवाडी?तून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हिरकणीवर उपलब्ध असलेली प्रसिद्ध जुनी कविता येथे देत आहे. पण प्रयत्न करूनही सदर कवितेच्या कवीचे नाव समजू शकले नाही. ते जे कोणी थोर गृहस्थ असतील त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत ती कविता येथे देत आहे.

रायगडावर राजधानी ती होती शिवरायांची ।
कथा सांगतो ऐका तेथील हिरकणी बुरुजाची ।

वसले होते गाव तळाशी वाकुसरे या नावाचे ।
राहात होते कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे ।
 
आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे ।
शोभत होते हिरा नाव त्या तडफदार घरवालीचे ।

सांज सकाळी हिरा जातसे दूध घेऊनी गडावरती ।
चालत होती गुजराण त्या नेकीच्या धंध्यावरती ।

एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली ।
ध्यानी आले नाही तिच्या कधी सांज टळूनी गेली ।

सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे ।
मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळ तान्हे माझे ।

हात जोडूनी करी विनवणी म्हणे जाऊद्या खाली मला ।
गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला ।

बाळाच्या आठवे झाली माय माउली वेडिपीसी ।
कडा उतरूनी धावत जाऊनी बाळाला ती घेइ कुषी ।

अतुलनीय हे धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले ।
साडी चोळी हिरास देऊनी प्रेमे सन्मानित केले ।

कड्यावरी त्या बुरूज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची ।
ऐकू येते कथा अजुनी अशी हिरकणी बुरूजाची ।

हिरकणीची ही शौर्यगाथा आजही रायगडावर सांगितली जाते आणि तो हिरकणी-बुरुज आईच्या प्रेमाची साक्ष देत आजही रायगडावर तटस्थपणे उभा आहे. एका शूर मातेची कथा सर्वांपर्यंत पोहोचावी एवढाच प्रयत्न.

🙏 माय,माऊली हिरकणी 🙏
🚩 जय भवानी जय शिवराय 🚩


Ranjit  posted in History

Post updated on:  Oct 21, 2021 6:41:25 AM

छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर
१६८०च्या सुमारास संभाजीराजे गादीवर बसले.

तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत (१६८९) चा हा केवळ
नऊवर्षांचा काळमहत्त्वाचा आहे.

?अवघे तेवीस वर्षांचे वय.
औरंगजेब, इंग्रज, पोर्तुगीज,
सिद्धी अशी गनिमांची संकटे चहूबाजूंनी
स्वराज्याला गिळंकृत करण्यास आली होती.
मात्रत्याही स्थितीत संभाजीराजे संकटांवर केवळ
स्वार झाले नाहीत; तर त्यांनी सर्वआक्रमकांच्या उरात
धडकी भरवली.

त्या नऊ वर्षांच्या काळातत्यांनी केवळ स्वराज्याचे संरक्षण केले नाही तरसंवर्धनही केले.स्वराज्याचा निम्म्या भारतात विस्तार केला.

पण राजपुतांची साथ मिळाली असती तर ते दिल्लीचे
तख्तही तेकाबीज करू शकले असते.

ही कामगिरी ?केवळ अद्भुत? म्हणता येईल अशीच आहे.जगात त्याची तुलना होऊ शकत नाही.

उण्यापुऱ्या नऊ वर्षांत एकही पराभव, तह
वा माघार नसलेल्या २४० लढाया त्यांनी केल्या.
सैन्यदल अफाट वाढवले. तंजावर (कर्नाटक),
मद्रास (मदुराई),पावणकोट, त्रिचनापल्ली (तमिळनाडू),पाटणा (बिहार), बंगालपर्यंत फौजा घुसवल्या.खजिना दुप्पटकेला.

शिवाजी महाराजांच्या राज्याचाविस्तार पाच हजार किलोमीटरपर्यंत वाढवला.नऊ वर्षांत २४०लढाया करणारे युवराज संभाजीराजेदिवसाच्या २४ पैकी १८ ते २० तास घोड्यावर असत.त्यांनी पत्नीला प्रशासकीय हक्क,अधिकार,स्वतंत्र शिक्का देऊन राज्य कारभार करायला प्रोत्साहन दिले.

स्वराज्याचा स्वतंत्रदारूगोळा कारखाना काढला.
तरलता तोफखाना काढला. जंजिऱ्याजवळ पूल
बांधला.नवी गावे बसवली. व्यापारीपेठा बसवल्या. धरणे बांधली.लढाईमुळे विस्थापित झालेल्यांचे
पुनर्वसनही केले.आरमार वाढवून दर्यावर हुकमत निर्माण केली.चार नवे किल्ले बांधले. पराक्रमी सैनिकांना बक्षिसेदिली.लढाईत मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबांची सोय केली.हे सारे करण्यास त्यांना केवळ नऊ वर्षे मिळाली. वाटते तेवढे सोपेनाही.

अद्भुत, अचाट, अतुलनीयच ठरेल.
?संभाजीराजांनी शत्रूंवर एवढी जरब बसवली,
की मुअज्जमआणि शहाबुद्दीन यांनी दोन बाजूंनी घेरण्याचीव्यूहरचना केली असताना गोवेकरांनी त्यांना मदतकरण्याचे धाडसदेखील केले नाही.
उलट संभाजीराजांचामार्ग मोकळा करण्यासाठी त्यांनी राजधानीच बदलली.

मोगलाईला धोका होता म्हणून?
मराठ्यांचे स्वराज्य रयतेचं, तर सर्व
शाह्या या बादशहांच्या होत्या.
स्वराज्याचा प्रयोग भारतभर
पसरण्याचा धोका होता
बुंदेलखंड त्याचे उदाहरण होते.

म्हणून औरंगजेब सर्व ताकदीनिशी स्वराज्य
उद्ध्वस्तकरण्यास दक्षिणेत आला.पण स्वतःचं राज्य समजूनमराठी जनता प्राणपणानं लढली.
संभाजीराजांचं हौतात्म्य त्यांच्या समोर आदर्श
होता.म्हणून औरंगजेबाचं स्वप्न अपुरं राहिलं.
त्याला पुन्हा उत्तरेलाही जाता आलं नाही.
त्याचा महाराष्ट्रातचअंत झाला...

अशाया शिवरायांच्या छाव्याचा पराक्रम कि अख जग त्यांनी पालथ घातल आणि त्याच्यावर स्वर झाले...

अशा या छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या या मावळ्यांन कडून कोटी कोटी प्रणाम __/\__

|| છત્રપતી શિવ શંમુ ||

 

☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀


Ranjit  posted in History

Post updated on:  Oct 20, 2021 5:44:39 AM

हिंदुस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच गनिमीकाव्याने युद्ध न होता मैदानी युद्ध झाले ते  दाऊदखान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात न भूतो न भविष्यती युद्ध झाले. हे युद्ध  मराठ्यांसाठी खुप महत्त्वाचे होते.  

        छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची बेसुरत करून राजगडाकडे खजिन्यासह दौडत सुटले ते थेट बागलाण प्रांतात आले. औरंगाबादचा सुभेदार शहाजदा मुअज्जमला खबर मिळाली. खबर ऐकून त्याने ताबडतोब   दाऊदखान यास पाठवले. छत्रपती शिवाजी महाराजांना दाऊदखान येत असल्याची खबर भेटली म्हणून ते वणी दिंडोरीच्या मार्गाने झपाटयाने निघाले.दाऊदखानाला खबर मिळाली की मराठे कांचमंचनच्या घाट पार करून नाशिककडे जाणार आहे. ही खबर कानी पडताच त्याने त्याने कांचनबरीच्या दक्षिणेकडे मराठयांना रोखायचे असे ठरवून तो त्या दिशेने कुच करू लागला. त्याच्यासोबत  मीर अब्दूल मबूद, इख्लासखान, राय मकरंद,नारोजी बसवंतराय,शेख सुफी ,भान पुरोहित संग्रामखान हे सरदार व बाकी मोठी  फौज होती 


      

छत्रपती शिवाजी महाराज कांचनबरीच्या किल्ल्यावर  फौजेसह,खजिना, संपत्ती वाहक बैल घोडे  १५हजार फौज होती . महाराजांना अजून एक समजली की दाऊदखान इकडेच येतोय फौज घेऊन. महाराजांना अगोदर पासून माहित होते की युद्ध अटळ आहे म्हणून खजिना, बैल,घोडे ५००० फौज  सप्तश्रृंगी व वणीच्या मार्गाने पाठवून दिले. 

 युद्धाचा दिवस उजाडला तारीख होती १७ ऑगस्ट १६७०.  खासा इख्लासखान कांचन किल्ल्याच्या पायथ्याशी आला. होता.तर त्याने त्याने बघितले तर मराठे जय्यत तयारीत आहेत व खुद्द खासे श्री छत्रपती शिवाजी महाराज चिलखत घालून ,हातात दांडपट्टा घालून घोड्यावर बसून युद्धाचे नेतृत्व करत होते.मराठयांनी इख्लासखान चा तोफखाना बरबाद केला. महाराजांनी केलेल्या युद्धरचने प्रमाणे इख्लास खान यास चारही बाजूंनी घेरले. इख्लासखान च्या ही गोष्ट लक्षात आली तो फौजेसह जाऊन मराठ्यांवर कोसळला. युद्ध सुरु झाले . मराठे शौर्याची पराकाष्ठा करीत होते. मोंगल सरदार कुमक करत होते. हत्ती मराठ्यांच्या ताब्यात आले खासा इख्लासखान जखमी होऊन घोडयावरून कोसळला. दाऊदखानला ही बातमी समजताच त्याने राय मकरंद नावाच्या सरदारास पाठवले.

         युद्ध खुप भयंकर चालले होते. मराठ्यांनी मुघलांचे पुरते कंबरडे मोडले होते . अजून एक संग्रामखान नावाचा सरदार लढता लढता जखमी झाला. बुंदेली बर्कंदाजांनी मराठयांन पथ्यावर धरले होते. त्यामुळे मराठयांची गती खेचली जात  होती. ऐन दुपारी दाऊदखान रणात आला त्याने इख्लासखानास बाहेर काढले. दोन प्रहर कडाक्याचे युद्ध झाले.३००० मोगल ठार झाले. दाऊदखानाची फौज खचली. मोगल घसरून पळून जाऊ लागले. त्यातच मीर अब्दूल मबूद याचा मोंगलांच्या मुख्य सेनेशी संबध तुटला.

मराठयांनी याचा फायदा घेऊन त्याच्यावर हल्ला चढवला त्यात त्याचा मुलगा ठार झाला. मराठयांनी तोफा,निशाणी जप्त केली. दाऊदखान याने युद्धाचा रंग बघता माघार घेण्याचे ठरवले.व्यंकोजी दत्तो,अण्णाजीपंत,मोरोपंत पिंगळे ,बालप्रभु चिटणीस , आनंदराव यांनी सुद्धां पराक्रमाची शर्थ केली  अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रचंड विजय झाला. युद्धात मिळालेले साहित्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराज कुंजरगडावर गेले. या मैदानी युद्धामुळे मराठेशाहीचा दरारा दाहीदिशी दणाणत होता.

प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर,महाराजाधिराज. श्री छत्रपती शिवाजी महाराज  व पराक्रमी रणझुंजार मावळयांना मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


Ranjit  posted in History

Post updated on:  Oct 20, 2021 5:43:57 AM

ये मराठे नहीं, भूत है !!!

घोडदळाच्या साह्याने गनिमीकाव्याची युद्धे शक्य होतात; परंतु पायदळाला तेवढा वेळ मिळत नाही. परंतु स्वराज्याच्या शिपायांना हा विचार करायलाही वेळ कुठे होता. रनाळा किल्ल्याला वेढा घालणा-या दिलेरला हुसकावून लावण्यासाठी पायदळातील एक हजार फौजेचा अधिकारी असणा-या रामाजीने दिलेरखानाला डिवचले. मिर्झाराजासोबत पुण्याकडे जाताना असेच पुरंदरजवळ खानाला डिवचल्याने पुरंदरचा तह स्वीकारावा लागला होता. एकंदरीतच मराठ्यांच्या शत्रूत दिलेरखान हा शेवटपर्यंत भारी ठरलेला दिसून येतो. तर रामाजी पांगेराने अफझलखान भेटीप्रसंगी निकराची लढाई दिलेली असल्याने तोही गनिमीकाव्यात पारंगत होता. सापाच्या शेपटीवर पाय पडल्यावर तो जसा चवताळावा त्याप्रमाणे दिलेर त्याच्या मागे लागला. तर रामाजीला पळण्याच्या बहाण्याने खानाला कण्हेर गडाच्या पायथ्याशी एका दरीत गाठायचे होते.
हजार-पाचशे मावळ्यांमागे दिलेरखानाची ३० हजार फौज पाठलाग करायला लागली. चांदवड, कळवण व आताची कण्हेरवाडीजवळ गावालगत कण्हेरगड उभा आहे. या ठिकाणी रामाजीने योजना आखली. दिलेर
खानाने दस्तुरखुद्द शिवाजी राजांनाही नाकीनऊ केले तिथे आपण कसा मुकाबला करावा ही कल्पना तयार होती. इच्छितस्थळी आल्यानंतर रामाजीची फौज थांबली. तिथे अगोदरच बाकीची तयारी झालेली होती. प्रसंग मोठा बाका होता. लढाई विषम होती. पण मराठ्यांना मरणाची भीतीच नसल्याने मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता. रामाजीने सहका-यांना जवळ बोलावले आणि सांगितले, जे आपलेसोबत असतील ते उभे राहणे. याचबरोबर लढाल तर सोन्याची कडी, पळाल तर चोळी-बांगडी? असे आवेशपूर्ण वाक्य उच्चारताच ७०० हशम उभे राहिले.

रामाजीची ही लढाई जगाच्या पाठीवरील एक वेगळीच लढाई ठरणार होती. मावळ्यांनी संपूर्ण कपडे उतरविले. अंगाला काळे फासले, हातात मशाली घेतल्या. दिलेरखानाची फौज समोर येताच जंगली आदिमानव दिसावेत या वेशात मराठे मोठमोठ्याने ओरडत खानाच्या फौजेपुढे नाचायला लागले. वाळवंटी प्रदेशात लढणा-या मोगली फौजेला ही काय भानगड आहे हे समजायला तयारच नव्हते. सभासद बखरीत याचे वर्णन अतिशय मार्मिकपणे सांगितले आहे. त्यानुसार, दिलेरखान याची फौज पायउतार होऊन चालून घेतले. चौफेरा मावळे लोक वेढिले. एक प्रहर टिपरी जैसी शिमग्याची दणाणते तैसे मावळे भांडिले.

रामाजी पांगेरा बेभान होऊन ठरलेल्या रणनीतीसह खानाच्या फौजेवर तुटून पडला. मशाली घेऊन नाचणा-या या जंगली माणसांनी मोगलांची फौज कापून काढायला सुरुवात केली. १५०० पठाणांना यमसदनास पाठविले. तेव्हा कुठे खानाच्या लक्षात आले, हे जंगली मानव वगैरे काही नसून शिवरायांचे मावळे आहेत. तेव्हा तो रामाजीवर तुटून पडला. आत 'हर हर महादेव' च्या घोषणा सुरू झाल्या. एवढ्या मोठ्या संख्येपुढे रामाजीचा टिकाव लागणे शक्य नव्हते. रामाजीला रूपाजी नळगेसारख्या सहका-यासह वीरमरण प्राप्त झाले.

दिलेरखान चकित होऊन रामाजीचा पराक्रम पाहतच राहिला. एक एकास वीस वीस तीस तीस जखमा तिराच्या, बर्चीच्या लागल्या. लोक मेले. मोठे युद्ध झाले. मग दिलेरखान यांनी तोंडात अंगोली घालून एक घटका आश्चर्य व्यक्त केले आणि म्हटले, "ये मराठे नही, भूत हैठ" रवळा , कण्हेरगडाची मोहीम अर्धवट सोडून दिलेरखान परत फिरला. खरं तर हा रामाजीचा विजय होता. कारण पुढील हालचालीवरून खानाला त्याला रोखायचे होते. त्यात तो यशस्वी ठरला होता. इच्छाशक्तीच्या जोरावर हत्याराविना उघडेबोडके होऊनही युद्धात यशस्वी होता येते हे शिवरायांच्या या मावळ्याने दाखवून दिले आहे.

रामाजीच्या पराक्रमाची वार्ता राजांच्या कानावर गेली आणि दु:खद बातमीने त्यांचे मन हेलावून गेले. स्वारीवर असताना राजांनी रामाजीचे गाव कोरजाईला भेट दिली. तेव्हा रामाजीचे वडील मारुतीचे त्यांनी सांत्वन करून रामाजीचा वडीलबंधू रूपाजीला भावाची जागा देऊन स्वराज्यात सामिल करून घेतले.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Ranjit  posted in History

Post updated on:  Oct 16, 2021 10:18:38 AM

छत्रपती शिवाजी महाराज सुरतवर चालून येणार आहेत या भीतीने गुजरातचा सुभेदार बहादुरखान हा आपल्या सैन्यासह एप्रिल १६७० पासून सुरतमध्ये तळ देऊन होता पण महाराजांनी यावेळी सुरतवर आक्रमण केले नाही. याचदरम्यान राजपुत्र मुअज्जम आणि दिलेरखान यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आणि बहादुरखानास सुरत सोडावे लागले याचाच फायदा घेत महाराजांनी सूरतेवर ऑक्टोंबर १६७० मध्ये दुसर्यांदा आक्रमण करायचे ठरवले आणि याची वार्ता इंग्रज, फ्रेंच, डच व्यापारी लोकांना समजले होती या लोकांनी आपल्या वखारीतील सर्व माल सुरतपासून दहाबारा मैलावर स्वाली नावाच्या बेटावर भरून ठेवला. या मोहिमेसाठी महाराजांनी दहा हजार घोडेस्वार आणि पायदळ आपल्याबरोबर घेतले होते. महाराज कल्याणवरून आणि ३ ऑक्टोंबर १६७० रोजी सुरत शहराच्या तटबंदीपाशी आले. यावेळी शहराच्या तटबंदीच्या रक्षणासाठी अवघे ३०० मोगल सैन्य होते. मराठ्यांनी शहराचा ताबा घेतला आणि मोठ्या मोठ्या सावकारांच्या वाड्यावर छापा टाकण्यास सुरूवात केली. या छाप्यात मराठ्यांना या वाड्यात प्रचंड खजिने मिळाले. सोने-चांदी, मौल्यवान थाल्या, हिरे, अनेक मौल्यवान सामान भेटले. मराठ्यांनी सलग तीन दिवस अनेक ठिकाणी छापे टाकले आणि यात त्यांनी जवळपास ६६ लाखांची संपत्ती स्वराज्यात सामील केली. इतक्यात महाराजांना बुर्हाणपूरवरून मोगल सैन्य सुरत शहराच्या रक्षणास येत आहे ही वार्ता समजली त्यावरून महाराजांनी आपल्या सैन्यासह सर्व संपत्तीसह स्वराज्याकड़े कुच केले..

छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर दुसर्यांदा आक्रमण करण्यासाठी सुरत शहरात दाखल झालेली इतिहासात नोंद असलेली तारीख आहे ३ ऑक्टोंबर १६७०

#शिवदिनविशेष
#सुरत_बेसुरत


Ranjit  posted in History

Post updated on:  Oct 13, 2021 4:46:45 AM

" कोणावरी चालून जाऊंन तुंबळ युद्ध करून रणास आणिले, कोणावरी छापे घातले, कोणास परस्परे कलह लाऊन दिल्हे, कोणाचे मित्रभेद केले, कोणाचे डेरीयात सिरोन मारामारी केली, कोणासी येकांगी करून परभिवले, कोणासी स्नेह केले, कोणाच्या दर्शनास आपण होऊंन गेले तर कोणास आपले दर्शनास आणिले, कोणास दगे करविले. यैसे ज्या ज्या उपाये जो जो शत्रु आकळावा तो तो शत्रु त्या त्या उपाये पादाक्रांत करून शताविधि कोटकिल्ले, तैसिच जलदुर्ग व कित्येक विषम स्थळे हस्तगत केली  "

आज्ञापत्रातील हे वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीचे वैशिष्ट दर्शवतात. मोगलांची प्रचंड साधने आणि महाराजांचे मर्यादित मनुष्य आणि संपत्ती बळ या पार्श्वभूमीवर महाराजांची युद्धनीति उठून दिसते. छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल आणि कसलेले असे सेनापती तर होतेच पण त्याच बरोबर ते युद्धाच्या राजकीय, सामाजिक अंगांचे उत्कृष्ट तज्ञ होते. उघड हल्ला केंव्हा करावा, माघार केंव्हा घ्यावी, शत्रूच्या हलचाली केंव्हा व कशा थांबवाव्या, शत्रुत आपसात कलह कसे लावावे हे सर्व युद्धनितीचे पायंडे महाराजांनी कसे वापरले होते हेच या वर्णनातून दिसून येते ..
______________________________________

राजनीतिधुरंदर, रणनीतीधुरंदर छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो ..

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Ranjit  posted in History

Post updated on:  Oct 10, 2021 8:08:04 AM

सरसेनापती धनाजीराव जाधवराव
      सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या म्रुत्यु नंतर मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून इसवी सन 1697 ते इ.स 1707 मराठा साम्राज्याच्या सरसेनापती पदाची धूरा सांभाळली. छत्रपती संभाजी महाराज तसेच छत्रपती राजाराम महाराज यांच्या म्रुत्यु नंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची कामगिरी तसेच सरसेनापती म्हणून मराठा साम्राज्याच नेतृत्व सांभाळले . छत्रपती राजाराम महाराज छत्रपती महाराणी ताराराणी तसेच हिंदूपती छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वात सरसेनापती म्हणून खूप मोठे योगदान दिले. छत्रपती शाहू महाराज यांना छत्रपतींच्या राजगादी वर बसविण्यात सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांचा खूप मोठा वाटा होता. शंभूराजे पुत्र शाहू महाराज हेच खरे मराठा साम्राज्याचे छत्रपती आहेत म्हणून अनेक मराठा सरदारांना शाहू महाराजांच्या बाजूने उभे केले.एक महत्वपूर्ण नाव म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट श्रीवर्धन वरून आलेल्या भट घराण्याला  सरसेनापती धनाजीराव यांनीच आधार दिला.आणि त्यांचाच शिफारशी मुळे मराठेशाहीचे पंतप्रधान पेशवा बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या पदी विराजमान झाले.
   मराठा साम्राज्याचा इतिहासात संताजी-धनाजी यांच्या पराक्रमाला तोड नाही .स्वराज्याच्या कठीण काळात ही त्यांनी आपल्या पराक्रमाने शत्रूची झोप उडवली. संताजी धनाजी हे नाव जरी ऐकलं तरी शत्रूच्या छावणीत भितीनेच हाहाकार माजत.मराठेशाहीच्या अशा महापराक्रमी, स्वामिनिष्ठ ,श्रीमान छत्रपतींच्या सरसेनापती धनाजीराव जाधवरावांना ह्या मावळ्याचा मानाचा मुजरा.मराठा साम्राज्याचे सरसेनापती धनाजीराव जाधवराव कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे चिरविश्रांती घेताहेत. त्यांचे समाधी स्मारक याठिकाणी उभारण्यात आले आहे.अश्या मराठेशाहीच्या हिंदवी स्वराज्याच्या महापराक्रमी सरसेनापतींच्या चरणी हा शिवशंभूंचा पाईक सदैव नतमस्तक 🙏🚩जय शिवराय🚩🙏जय शंभूराजे 🚩🚩🚩🙏



Ranjit  posted in History

Post updated on:  Oct 10, 2021 8:01:37 AM

आजपासून रोज १ अष्टविनायकातील एक एक गणरायाची माहिती घेणार आहोत.

*अष्टविनायक १* 

🔱 *मोरगावचा मयूरेश्र्वर*  🌺

पुण्यापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगांव या गावी कऱ्हा नदीच्या काठावर श्री मयुरेश्वर मंदिर स्थित आहे. या परिसराला 'भूस्वनंदा' या नांवानेसुद्धा ओळखले जाते. मोरगांव याचा शब्दशः अर्थ मोरांचे गांव असा आहे. कोणे एके काळी या गांवाचा आकार हा मोराप्रमाणे तर होताच शिवाय येथे भरपूर प्रमाणात मोरांची वस्ती होती. म्हणून या गांवाला मोरगांव म्हटले जाते. अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात ही या मंदिराच्या दर्शनाने केली जाते.

अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो. 

येथील मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहमनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. 
मुघल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. 
देवळाच्या बाजूने ५० फुट उंचीची संरक्षण भिंत आहे.

▶️श्री मयुरेश्वरची कथा :

आख्यायिकेनुसार मिथिला येथील गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता. तो आणि त्याची राणी उग्रा हे मुल नसल्यामुळे दुःखी होते. त्या दोघांनी सूर्याची उपासना केली आणि आशीर्वादस्वरूप राणीला दिवस गेले. परंतु त्या गर्भाचे तेज आणि प्रभा राणी सहन करू शकली नाही आणि तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले. त्यातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. ब्राम्हणाच्या रुपात समुद्राने त्या मुलाला राजाच्या हवाली केले. समुद्रात जन्म पावल्याने राजाने आपल्या मुलाचे नाव सिंधू ठेवले. सूर्याची उपासना करणारा हा सिंधू जस जसा मोठा होत गेला तसतसा तो अधिकाधिक बलशाली होऊ लागला. सिंधूवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देऊ केले आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही. अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आदि देवांवर आक्रमण केले. त्याने सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात डांबले. मग उरलेल्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि त्याला असुर राजा सिंधूपासून त्यांना वाचवण्याची विनंती केली. त्यांच्या प्रार्थनांनी प्रसन्न होऊन गणपतीने त्रेतायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेऊन सिंधू राक्षसाला ठार मारले. यासाठी गणपती मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाला आणि याचठिकाणी सिंधूचे मुंडके पडले. 

▶️श्री मोरेश्वर मंदिर आणि परिसर :

या मंदिरात मयूरेश्र्वराबरोबर रिद्धी व सिध्दी यांच्याही मूर्ती आहेत. 
असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्र्वराची मूर्ती बनवली आहे. 
पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधूसूराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.

सध्याची मयूरेश्र्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे.

असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.

▶️श्री मोरेश्वर पूजा आणि उत्सव :

सकाळी ५ वाजता प्रक्षाल पूजा (गणपतीचे स्नान), सकाळी ७ वाजता शोडपचार पूजा, दुअपारी १२ वाजता दुसरी शोडपचार पूजा, रात्री ८ वाजता पंचोपचार पूजा आणि रात्री १० वाजता शेजारती केली जाते.

मुख्य गणेश मूर्तीची पूजा दररोज सकाळी ७, दुपारी १२ आणि रात्री ८ वाजता केली जाते. माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी या दोन दिवशी भक्त मोठ्या प्रमाणावर मयुरेश्वराचे दर्शन घेण्यास गर्दी करतात. या दोन्ही दिवशी चिंचवड येथे संत मोरया गोसावी यांनी स्थापिलेल्या मंगलमुर्ती मंदिरातून भक्तगण पालखी घेऊन येतात. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसात मयूरेश्वराच्या मंदिरात जत्रा भरते. विजयादशमी आणि सोमवती अमावस्या हे दिवससुद्धा साजरे केले जातात.

▶️जाण्याचा मार्ग :
हे मंदिर पुण्यापासून अंदाजे ६४ किलोमीटरवर असून कर्हा नदीजवळ आहे. 
पुणे लोणी चौफुला करत आपण मोरगावला जाऊ शकतो. 
पावसाळ्यात येथे मोर बघायला मिळतात

पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे यादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खासगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याचे रिसोर्ट उपलब्ध आहेत.

▶️जवळची इतर दर्शनीय स्थळे :

पांडवांनी बांधलेले पांडेश्वर मंदिर. अंतर अंदाजे १२ किमी
जेजुरीचे श्री मल्हारी मार्तंड खंडोबाचे देऊळ. अंतर अंदाजे १७ किमी
जेजुरीपासून दोन किमी अंतरावर लवथळेश्वर हे शिवमंदिर. अंतर अंदाजे १९ किमी
सासवड येथीर संत सोपान महाराज यांची समाधी. अंतर अंदाजे ३४ किमी
नारायणपूर येथील एकमुखी दत्ताचे मंदिर, शिवमंदिर, बालाजी मंदिर आणि पुरंदर किल्ला. अंतर अंदाजे ४२ किमी


           ॥वक्रतुंड महाकाय सुर्य कोटी समप्रभ॥
            ॥निर्विघ्नं कुरुम देवे सर्व कार्येशु सर्वदा॥

            ❁🌺||गणपती बाप्पा मोरया||🌺❁                 


॥ ॐ नम: शिवाय, ॐ नमो नारायण ॥
          ॥ जय श्रीराम, जय श्रीकृष्ण....॥🐚🚩

Post updated on:  Sep 12, 2021 1:48:29 AM

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🙏🚩🚩 

* या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा असता मऱ्हाठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.
 - सभासद 

* सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले. केवल नूतन सृष्टीचं निर्माण केली.
 - आज्ञापत्र

* राष्ट्रनिर्माता म्हणून मान्यता पावणे यासारखे मनुष्याच्या आयुष्यात अन्य कोणतेही श्रेष्ठ विधिलिखित असू शकत नाही; नेमके हेच महतकृत्य शिवाजी महाराजांनी करून दाखवले आहे.
 - जदुनाथ सरकार

* शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाचा सुकत आलेला वृक्ष पुनरुज्जीवित केला ही भरतखंडास अभिमानास्पद कामगिरी घडली. राज्याभिषेक नसता तर हिंदुमात्राची सहानुभूती राजारामकालीन संकटसमयी मराठ्यांस लाभली नसती. आपल्या अनुयायांत श्रद्धा निर्माण करणे हे शिवाजी महाराज यांचे स्वराज्यरक्षणासाठी आद्य कर्तव्य होते; व ती गोष्ट राज्याभिषेक शिवाय अन्य कोणत्याही उपायाने सध्या झाली नसती.
- शेजवळकर 

* हिंदवी स्वराज्य ही अत्यंत महत्वाची व आवश्यक क्रांती झाल्याने भारतात हिंदू समाजाला जगता आले. त्यामुळे शेवटी इस्लामी सत्तांना नामोहरम होऊन राहावे लागले हाच सर्वात मोठा सामाजिक विक्रम होय. हा विक्रम शतकानुशतके भारतीय जनतेच्या स्मरणातून दूर जाणार नाही.
- वा. सी. बेंद्रे

* स्थापन केलेले राज्य हे खऱ्या अर्थाने कल्याणकारी ठरावे,  आपल्या जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा, आपले सांस्कृतिक जीवन समृद्ध व्हावे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्राची अस्मिता जागृत व्हावी यासाठी महाराजांनी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा, ही सर्व पाहता त्यांचे आयुष्य म्हणजे समकालिकांना एक चमत्कार तर वाटलाच, पण आजतागायत भारतातील पिढ्या त्यांच्या चरित्राने भारावून गेल्या आहेत.
- सेतुमाधवराव पगडी 

* शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे सर्व भारतभर पसरलेल्या प्रजेला आपण तुमचे मुक्तीदाते अहोत, , आणि रक्षणकर्ते आहोत असे आश्वासन होते. हे माझे राज्य आहे, ते मला टिकवलेच पाहिजे, या जिद्दीने जनता मध्ययुगीन भारताच्या इतिहासात फक्त एकदाच लढली ती शिवाजी महाराज यांच्या राज्यासाठी. भारताच्या इतिहासात अशी ज्योत जनतेच्या मनात शिवाजी महाराजांनी प्रथम पेटवली म्हणून शतकानुशतके लोक त्यांना आपला त्राता, उद्धारकर्ता मानत आले. कोणत्याही शतकातील जनतेच्या मनात असणाऱ्या प्रबळ स्वातंत्र्याकांक्षेचा शिवाजी महाराज हे प्रतिनिधी ठरले.
- नरहर कुरुंदकर

पौरुषता के परंपरा का महापराक्रमी राजा था।
और पुनराभिषिक्त होने वाला,
यह राष्ट्रपुरुष शिवराया था।
यह राष्ट्रपुरुष शिवराया था।

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Ranjit  posted in History

Post updated on:  Aug 3, 2021 1:34:40 PM

Discover your area of interest

More recent categories

Back to top